भंडारदरा, कोतुळ |वार्ताहर| Bhandardara
नगर जिल्ह्याला फायदेशीर असणार्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात रिपरिप सुरू असून धरणांत नव्याने पाण्याची आवक पुन्हा सुरू झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात गत 24 तासांत 157 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे काल सायंकाळी पाणीसाठा 10082 दलघफू (91.33%) पाणीसाठा झाला होता. आज सकाळपर्यंत हा पाणीसाठा 92 टक्क्यांच्या पुढे गेलेला असेल.
- Advertisement -
पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघरमध्ये 38 आणि रतनवाडीत 21 जममी पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीसाठा 7149 दलघफू (85.84%) झाला होता. मुळा पाणलोटात काल दुपारपासून पावसाचा काहिसा जोर वाढल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा प्रवाह 977 क्युसेक होता. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात 22596 दलघफू पाणीसाठा झाला होता.




