Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBharat Gogawale: "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचं श्रेय घेऊ नये..."; भरत गोगावलेंचा मनोज जरांगेंना...

Bharat Gogawale: “कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचं श्रेय घेऊ नये…”; भरत गोगावलेंचा मनोज जरांगेंना इशारा, नेमका वाद काय?

मुंबई | Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारच्या विनंतीला मान देऊन मराठा आरक्षण, जात पडताळणीसंदर्भातील उपोषण मागे घेतलं असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर काही आरोप केले जात आहेत. गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावेळी सत्ताधारी आणि जरांगे पाटील यांच्यात वार-पलटवार झाल्याचं पाहायला मिळालं. जरांगे पाटलांनी यावेळी आपल्या आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांनी पलटवार केला. आता, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा मंत्री भरत गोगावले यांच्याकडून समाचार घेण्यात आला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य केले आहे, एकनाथ शिंदे यांची शान या पठ्ठ्यानं वाढवली आहे, गरीब मराठ्यांनी वाढवली असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावर भरत गोगावलेंनी पलटवार केला. “एकनाथ शिंदे यांची शान लाखो लाडक्या बहिणी, मराठे आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे वाढली आहे. कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊ नये आणि ठाण्याला कोणी आव्हान देऊ नये,” असा इशारा गोगावले यांनी दिला.

- Advertisement -

CM Devendra Fadnavis: दुष्काळी परिस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार, CM फडणवीसांचं आश्वासन

कोणी ऐऱ्या गैऱ्याने श्रेय घेऊ नये
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर मंत्री भरत गोगावले यांनी पलटवार केला, एकनाथ शिंदे यांची शान लाखो लाडक्या बहिणी, मराठे आणि शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामामुळे वाढली आहे. कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचं श्रेय घेऊ नये आणि ठाण्याला कोणी आव्हान देऊ नये, अशा शब्दात भरत गोगावलेंनी जरांगे पाटलांवर पलटवार केला. तसेच, मराठे म्हणून आम्ही याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जरांगे यांनी सरकारवर टीका करत विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने मदत करूनही सरकारकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला होता.

तर, जरांगे पाटलांवर टीका करण्यासाठी 11 टीम नेमण्यात आल्या, कॅबिनेटमध्ये एका मंत्र्याने जरांगे पाटलांचं आता ऐकायचं नाही, असं म्हटल्याचा दाखल देत नाव न घेता जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर टाकी केली.

ताज्या बातम्या