Saturday, April 26, 2025
Homeक्राईमभिंगार, सावेडी उपनगरातून दोन मुलींना पळविले

भिंगार, सावेडी उपनगरातून दोन मुलींना पळविले

पोलिसांत गुन्हे दाखल || मुलींचा शोध सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार व सावेडी उपनगरातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना रविवारी (13 ऑक्टोबर) घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस मुलींचा शोध घेत आहेत. सावेडी उपनगरात राहणार्‍या 34 वर्षीय महिलेने रविवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी (वय 16) रविवारी सकाळी सावेडी उपनगरातील एका घरी कामानिमित्त गेली होती. तेथून ती पुन्हा घरी न आल्याने फिर्यादीने तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादीने तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक यु. एन. राजपुत करत आहेत.

नगर तालुक्यात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेने रविवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी फिर्यादी व त्यांची अल्पवयीन मुलगी (वय 14) नगर- पाथर्डी रस्त्याने घरी जात असताना विजय लाईन चौक, भिंगार येथून मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. फिर्यादी यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. फिर्यादी यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना रात्री माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या