Thursday, September 10, 2026
HomeनगरAhilyanagar : मिशन सुधारमध्ये 13 हजार रेशनकार्ड बाद

Ahilyanagar : मिशन सुधारमध्ये 13 हजार रेशनकार्ड बाद

जिल्ह्याचे 212 मेट्रिक धान्यांचे आवंटन घटले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सरकारच्यावतीने गरजू व पात्र रेशनकार्डधारकांनाच सरकारी स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, यासाठी मिशन सुधार या कार्यक्रमांतर्गत रेशनकार्डाची छाननी सुरू आहे. यामध्ये अपात्र, बनावट, मृत व्यक्ती, स्थलांतरित व निष्क्रिय असे 13 हजारांवर रेशनकार्ड पडताळणीअंती पुरवठा विभागाद्वारे बाद करण्यात आला असून परिणामी 212 मेट्रिक धान्य जिल्ह्याचे घटले आहे.

- Advertisement -

पुरवठा विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या या पडताळणी मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 12 हजार 631 संशयास्पद रेशनकार्डधारक अपात्र आढळले असून त्यांचे धान्य तातडीने बंद करण्यात आले आहे. शासनाकडून जिल्ह्यातील 38 हजार 737 संशयास्पद लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली होती. या यादीतील शंभर टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाली आहे. पडताळणी झालेल्यांपैकी 12 हजार 631 लाभार्थी अपात्र ठरले आहेत.

मिशन सुधार योजनेत लाभार्थ्यांची संख्या घटल्याने जिल्हा पुरवठा विभागाला जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यासाठी धान्य कमी आले आहे. यात प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना पाच मेट्रिक टन गहू वाढून मिळाला आहे, तर 392 मेट्रिक टन तांदूळ कमी झाला आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचा 65 मेट्रिक टन गहू घटला आहे, तर 44 मेट्रिक टन तांदूळ कमी झाला आहे. अन्नसुरक्षा योजनेतील गैरव्यवहार रोखणे आणि बोगस शिधापत्रिका रद्द करण्यासाठी शासनाने मिशन सुधार मोहीम सुरू केली होती. याद्वारे डेटा विश्लेषणातून प्राप्त संशयास्पद, दुबार व मृत लाभार्थ्यांची ई-पॉस व प्रत्यक्ष तपासणी करून बोगस नावे डिलीट केली आहेत.

यामुळे झाले अपात्र
ग्रामीण भागात 44 हजार व शहरी भागात 59 हजारांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणे. चारचाकी वाहन असणे, आयकर भरणारे कुटुंब किंवा शासकीय नोकरीत असलेले सदस्य. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, स्थलांतरित व दीर्घकाळ निष्क्रिय असलेली शिधापत्रिका या कारणामुळे रेशनाकार्ड बाद करण्यात आलेले आहे.

रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मका
जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना ऑगस्ट महिन्यापासून गहू, तांदळासोबत मक्याचे वाटप केले जाणार आहे. यंदा मक्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने शासनाने खरेदी-विक्री महासंघामार्फत 6 हजार क्विंटल मका व 8 हजार क्विंटल ज्वारी हमीभावाने खरेदी केली होती. हीच खरेदी केलेला मका व ज्वारी रेशन प्रणालीद्वारे नागरिकांना दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

ताज्या बातम्या

Accident News : आयशर टेम्पो आणि कारची भीषण धडक ; एकाच...

0
अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar नगर-कल्याण महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीप समोर गुरुवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो (Eicher Tempo) आणि...