Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमCrime News : भिंगारमध्ये तिरट जुगार अड्ड्यावर छापा

Crime News : भिंगारमध्ये तिरट जुगार अड्ड्यावर छापा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार परिसरातील मोमीन गल्ली ते नागरदेवळे जाणार्‍या रस्त्यालगतच्या काटवणात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकून चार जुगार्‍यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख 42 हजार 290 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

मोमीन गल्ली ते नागरदेवळे जाणार्‍या रस्त्यालगतच्या काटवणात तिरट जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सदर ठिकाणी छापा घातला. यावेळी शिवराम आण्णा मोरे (वय 52, रा. बुर्‍हाणनगर, ता. अहिल्यानगर), सतीश भगवान अडागळे (वय 36, रा. गोविंदपुरा नाका), आकाश बाबासाहेब शिंदे (वय 32, रा. महापालिका शेजारी, अहिल्यानगर) आणि सुदर्शन हरिश्चंद्र ठोंबे (वय 54, रा. रांजणी, ता. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. हे सर्वजण पैशांवर हार-जीत लावून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे पोलिसांना आढळून आले.

घटनास्थळी संशयितांकडून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, दोन दुचाकी वाहने तसेच खेळासाठी वापरण्यात येणारे पत्ते व डावातील रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोलीस अंमलदार महादेव पवार यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार बापुसाहेब म्हस्के अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : आत्मविश्वास की वास्तवाशी फारकत?

0
नाशिक / शैलेंद्र तनपुरे - दै. देशदूत - संपादक बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी एक आव्हान देणारी उक्ती मराठी भाषेत आहे....