Wednesday, April 8, 2026
Homeनगरभिंगार होणार नगरचे उपनगर

भिंगार होणार नगरचे उपनगर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भृंगऋषींच्या अस्तित्वाने लौकिकप्राप्त भिंगार आता नगर शहराचे (Ahmednagar City) नवे उपनगर होणार आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्ड (Cantonment Board) असलेल्या भिंगार शहराचा महापालिका (Municipal Corporation) हद्दीत समावेश करण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारने मनपा आयुक्तांकडे मागितला आहे. त्यामुळे आता भिंगार शहर मनपा हद्दीत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मनपाच्या येत्या डिसेंबर महिन्यात होणार्‍या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हा बदल अपेक्षित आहे.

- Advertisement -

संगमनेरच्या टोळीकडून चोरलेल्या 51 मोटारसायकली हस्तगत

भिंगारमधील छावणी मंडळाची (Bhingar Camp Board) कोरोनामुळे लांबलेली व तब्बलसात वर्षांनी नुकतीच जाहीर झालेली निवडणूक (Election) रद्द झाल्याने त्याचवेळी भिंगारचा समावेशअहमदनगर मनपा हद्दीत होण्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यानगर विकास विभागाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना पत्र पाठवून, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महापालिकाहद्दीच्या क्षेत्रात समाविष्ट करावे किंवा कसे, याबाबत आपले स्पष्ट मत व या बदलाच्याअनुषंगाने आवश्यक गरजांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याता भिंगार कॅन्टोन्मेंट (Cantonment Board) परिसर नगर शहराच्या हद्दीत समाविष्टहोऊन भिंगार हे आता केडगावप्रमाणेच (Kedgav) नवे उपनगर होणार आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात नगर शहरासह भिंगारचाही समावेश आहे. त्यामुळे आता भिंगार जर मनपामध्ये समविष्ट झाले तर नगर शहर विधानसभा मतदारसंघ व महापालिका कार्यक्षेत्राचा विस्तार होणार आहे.

ओढ्या-नाल्यांतील पाईप सात दिवसांत काढणार

कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर महापालिकेत जाणारअसल्याने भिंगारकरांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. नगर विकास विभागानेराज्यातील एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा त्यांच्या लगत असलेल्या महापालिकांमध्येसमावेश करण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीच्या माहितीचा अहवाल सादर करण्याचेआदेश दिले आहेत. भिंगार (अहमदनगर), पुणे, पिंपरी-चिंचवड, खडकी, देहू, देवळाली, औरंगाबाद व नागपूर येथील कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डमहापालिका आयुक्तांना हे आदेश देण्यात आले आहेत.

नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, स्थायी समितीत पडसाद

या आदेशानुसार भिंगार येथील अहमदनगर छावणी परिषदेचे अहमदनगर महापालिकेत (Ahmednagar Municipal Corporation) विलिनीकरण करता येईल का? विलिनीकरण केल्यास महापालिकेचे सुधारित क्षेत्र, लोकसंख्या किती होईल तसेच प्रभागरचना व अन्य काय बदल होतील, या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य सरकारने अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Jawale) यांना मागितला आहे. त्यामुळे भिंगार शहरअहमदनगर महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता वाढली आहे.

शौचालयाच्या आडोशाला बंद बरणीत आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक

शासनाने मागवलेल्या या माहितीमुळे अहमदनगरमधील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा प्रश्न अखेर मार्गीलागण्याची चिन्हे आहेत. या अहवालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाची सध्याची हद्द,लोकसंख्या, त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट हद्द महापालिकेत समाविष्ट झाल्या नंतर महापालिकेची हद्द आणि लोकसंख्या किती होईल, याबाबतची माहिती राज्य सरकारने मागितली आहे.

तोफखाना पोलिसांची जुगार, हातभट्टीवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून देशातल्या 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.येत्या 30 एप्रिल रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी मतदान होणार होते.यामध्ये पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही समावेश होता. मात्र, या निवडणुका रद्द झाल्या व आता नव्याने भिंगारचा समावेश नगर मनपामध्ये करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मित्राच्या मदतीने पतीकडून पत्नीला मारहाण

सदस्य संख्या अन् बजेट वाढणार

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सात सदस्य आहेत व नगर मनपाचे 68 नगरसेवक आहेत. भिंगार शहराचा समावेश नगर मनपामध्ये झाल्यास दोन्हीमिळून नगरसेवक संख्या 75 होईल, स्वीकृत नगरसेवकही 8 होतील. मनपाचे बजेटही वाढणार आहे. भिंगार हे नगरचे नवे उपनगर झाल्यावर तेथील स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य व नागरी सुविधांची जबाबदारी मनपावर येणार आहे. अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यावर वाढीव पाणी भिंगारला देण्याची ग्वाही मनपाने याआधीच दिली आहे. पण आता वाढीव पाणी कर्तव्य म्हणून द्यावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पेट्रोल, डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचा फिटनेसचा प्रश्न गंभीर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar आधीच अमेरिका- इस्त्राईल आणि इराण युध्दामुळे विस्कळीत झालेला इंधनाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 450 ते 500 पैकी जवळपास निम्म्या पेट्रोल,...