Monday, July 6, 2026
HomeनाशिकNEET Paper Leak Nashik Connection : संशयिताने वेशभूषा बदलली, केस कापले; संशयिताला...

NEET Paper Leak Nashik Connection : संशयिताने वेशभूषा बदलली, केस कापले; संशयिताला अटक कशी केली? किरणकुमार चव्हाण यांनी सगळंच सांगितलं

नाशिक | Nashik

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलेल्या विद्यार्थ्यांनी दि.०३ मे २०२६ रोजी नीट परीक्षा दिली होती. देशातील (Country) सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचा (Student) समावेश होता. मात्र, देशभरात ४२ तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्यामुळे केंद्र सरकारने ही परीक्षा (Exam) रद्द करण्याचा निर्णय घेत सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! २०२६ मध्ये घेण्यात आलेली NEET ची परीक्षा रद्द; CBI चौकशीचे आदेश

या पेपर फुटीप्रकरणी आज (मंगळवारी) राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने इंदिरानगर भागातून डॉ. शुभम खैरनार याला ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी सीबीआय व राजस्थान पोलीसांच्या (Rajasthan Police) ताब्यात दिले जाणार आहे. शुभम हा मुळचा नाशिकच्या नांदगावचा रहिवासी असून तो मध्यप्रदेशातील शिवार येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संशयित शैक्षणिक समुपदेशक म्हणून काम करीत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान याप्रकरणी पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण (Kirankumar Chavan) यांनी माध्यमांशी बोलतांना अधिक माहिती दिली आहे.

हे देखील वाचा : NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन; एक जण ताब्यात

किरणकुमार चव्हाण काय म्हणाले?

नीट २०२६ परीक्षेच्या कथित पेपर फुटीशी नाशिकचे (Nashik) संबंध असल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी संशयिताची माहिती नाशिक पोलिसांना देऊन त्याला पकडण्याची विनंती केली होती. या आधारे संशयिताला इंदिरानगर भागातून ताब्यात घेण्यात आले. संशयिताने स्व:ताची वेशभूषा बदलली होती. केस कापलेले होते. त्यामुळे त्याची माहिती मिळत नव्हती. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने तांत्रिक कौशल्याने संशयिताचा छडा लावला. राजस्थान पोलिसांचे पथक नाशिकमध्ये येत असून, संशयिताला त्यांच्या स्वाधीन केले जाईल, असे किरणकुमार चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...