Monday, October 19, 2026
HomeनगरShrirampur : भोंदू बाबाचे श्रीरामपूरच्या निपाणी वडगाव कनेक्शन

Shrirampur : भोंदू बाबाचे श्रीरामपूरच्या निपाणी वडगाव कनेक्शन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भोंदू बाबा कॅप्टन खरात याचे श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. गावातील एक तथाकथित महाराज आणि अनेक तरुण त्याच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याने ग्रामस्थांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात नावाच्या भोंदू बाबाच्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, तो केवळ भोंदूगिरीच नव्हे, तर महिलांचे लैंगिक शोषण करणारा एक विकृत मास्टरमाईंड असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता निपाणी वडगावपर्यंत पोहोचले असून, येथील एक तथाकथित महाराज दीर्घकाळापासून खरातच्या निकटवर्तीय असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. केवळ हे महाराजच नव्हे, तर गावातील अनेक तरुण आणि अंधभक्त या जाळ्यात ओढले गेल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावरील काही फोटोंमुळे आणि खरातसोबत असलेल्या व्हिडिओंमुळे या संशयाला अधिक बळ मिळाले आहे.

या प्रकारामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित तथाकथित महाराजांची पार्श्वभूमी आणि त्याचे लैंगिक अत्याचाराचा आरोपी कॅप्टन खरात याच्याशी असलेले आर्थिक व सामाजिक संबंध तातडीने तपासावेत, निपाणी वडगावमधील आणखी किती व्यक्ती या भोंदूगिरीच्या आणि गुन्हेगारी जाळ्यात अडकल्या आहेत, याचा छडा लावण्यासाठी विशेष पथकामार्फत चौकशी व्हावी, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि इतर संबंधित कलमान्वये दोषी आढळणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा विकृत आणि भोंदू लोकांमुळे तरुण पिढी भरकटली जात आहे, खरातसारख्या गुन्हेगाराचे कनेक्शन गावात असणे ही गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने चौकशी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ ऑक्टोबर २०२६ – डिजिटल व्यवहारांचे अर्थकारण आणि विश्वास

0
Daily Deshdoot Editorial 19 October 2026 भारताच्या डिजिटल क्रांतीने आर्थिक व्यवहारांचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत आणि भाजीविक्रेत्यापासून नामांकित व्यापार्‍यापर्यंत सर्वत्र यूपीआय...