Monday, October 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजहार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

पुनदखोरे | वार्ताहर

- Advertisement -

कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम संतोष मोरे असे मृत तरुणाचे नाव असून, तो कुत्तरबारी येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुत्तरबारी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कळवण तालुक्यातील पुनंद खोऱ्यातील हुंड्यामोख शिवारात सोयाबीन काढणीचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. हुंड्यामोख शिवारात सोयाबीन काढणीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर यंत्रात ओम मोरे हा सोयाबीनच्या पेंढ्या टाकत असताना त्याचा हात व डोके यंत्रात अडकून ओम मोरे याचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

अल्पवयीन तरुणाच्या मृत्यूने हळहळ
ओम संतोष मोरे हा अवघ्या १५ वर्षांचा होता. कमी वयात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने हुंड्यामोख,कुत्तरबारीसह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.याबाबत कळवण पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार बर्डे यांनी मृत्यू र. न.४६ /२०२६ बीएनएसएस १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार डंबाळे करीत आहे.

शेतीच्या कामादरम्यान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शेतीच्या कामासाठी आधुनिक यंत्रांचा वापर वाढत असताना यंत्रांच्या आसपास आवश्यक सुरक्षितता राखणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून नेमकी परिस्थिती स्पष्ट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela : नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन – कुंभमेळा प्राधिकरण...

0
नाशिक, दि. १८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी...