Tuesday, December 3, 2024
Homeनगरभूईकोट किल्ला परिसरात आढळले 46 प्रजातींचे पक्षी

भूईकोट किल्ला परिसरात आढळले 46 प्रजातींचे पक्षी

पक्षी दिनानिमित्त पक्षी निरीक्षणाचा उपक्रम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील हरियाली संस्था व अहमदनगर बर्डींग पाल्सच्या वतीने राज्य पक्षी सप्ताह आणि राष्ट्रीय पक्षी दिना निमित्त ऐतिहासिक भूईकोट किल्ला परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी पक्षी मित्रांना 46 प्रजातींचे अनेक पक्षी आढळून आले असून त्यांची नोंद भारताच्या अधिकृत ई बर्ड चेक लिस्टवर करण्यात आली आहे. याप्रसंगी हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी या उपक्रमासाठी उपस्थित असलेल्या पक्षी मित्रांचे स्वागत करून पक्षी सप्ताहाचे महत्व विषद करताना सांगितले, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारूती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ.सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासन 5 ते 12 नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो.

- Advertisement -

राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हा यामागचा उद्देश आहे. भूईकोट किल्ल्याच्या बाहेरील बाजुने असलेल्या 2 की.मी. अंतराच्या खंदकात पाण्यामधील पाण पक्षांसह सर्वसाधारण पक्षी लांबपल्ल्यांच्या दुर्बीणीच्या साह्याने शोधून पक्षी निरीक्षण करून त्यांची नोंद घेतली. तसेच अनेक पक्षांचे फोटो कॅमेर्‍यातही घेतले. यामध्ये नेहमी दिसणार्‍या पक्षांसोबतच काही दुर्मिळ पक्षीही आढळले.

यामध्ये प्रामुख्याने रानधोबी या पक्षासह खंड्या, हुदहुद, पिंगळा, ढोकरी, सातभाई, साळुंकी, होला, भारव्दाज, वेडा राघु, बुलबुल, टिटवी, कोतवाल, गाय बगळा, पाणकोंबडी, हळदी कुंकू, मोर, लांडोर, आदी 46 प्रजातींचे अनेक पक्षी आढळून आले असुन त्यांची नोंद भारताची ई बर्ड चेक लिस्ट मध्ये करण्यात आली आहे. या निरीक्षण उपक्रमात सुरेश खामकर, अजिंक्य सुपेकर, चारूता वैद्य, आश्लेषा कुलकर्णी, प्रिया कोठारी, दिपाली येनगंदुल, डॉ. शोनक मिरीकर, ऋषीकेश मंगलारम, डॉ.हेमंत कुलांगे, नितीन मगजी, डॉ. धनंजय कुंभार, अभीजीत हंपे, ठाकुरदास परदेशी, श्रीरंग राहिंज, तुषार लहारे, अमोल बासकर, सागर थोरवे आदींसह 54 पक्षी मित्र सहभागी झाले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या