नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाल्यानंतर या सर्व या गदारोळातच घटनादुरुस्तीसह तीन महत्त्वाची विधेयके सभागृहात मांडण्यात आली होती. दरम्यान १३१ व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मतदानानंतर बहुमता अभावी हे विधेयक नामंजूर करण्यात आले आहे. दरम्यान तीन पैकी उर्वरीत दोन विधेयक सरकारने मागे घेतली आहे.
आज संध्याकाळी लोकसभेत महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयक दुरुस्तीसाठी मतदान घेण्यात्त आले, मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ मतदान तर विधेयकाच्या विरोधात २३० मतदान झाले तर एकूण५४० सदस्यांपैकी ५२८ खासदारांनी मतदान केले. यात विधेयक मंजूर करण्यासाठी असलेले २/३ मतदान म्हणजेच ३६० मतदान विधेयकाच्या बाजूने झाले नसून हे विधेयक नामंजूर झाले आहे.
दरम्यान हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीच, मात्र 2023 मध्ये पास झालेलं विधेयक आणा असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर मणिपूर आणि इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचं उदाहारण देत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे.





