Wednesday, April 29, 2026
Homeमनोरंजन"तो एक शांतता मागे सोडून गेला…"; 'विरु'च्या जाण्याने बिग बींना भावना अनावर,...

“तो एक शांतता मागे सोडून गेला…”; ‘विरु’च्या जाण्याने बिग बींना भावना अनावर, पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी केली

मुंबई | Mumbai
दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजणारे धर्मेंद्र यांना याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरीच त्यांच्यावर उपचार केले जात होते. 24 नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक पुन्हा बिघडली आणि दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्लेमधील स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिथे त्यांचे जीवलग मित्र अमिताभ बच्चन दाखल झाले होते. जवळजवळ 50 वर्षांपूर्वी ‘शोले’ चित्रपटात धर्मेंद्रसोबत काम केलेले अमिताभ बच्चन या बातमीमुळे खिन्न झाले आहेत. त्यांच्यासाठी, धर्मेंद्र हे केवळ सह-कलाकार नव्हते, तर कुटुंबासारखे होते आणि त्यांचे जाणे हे बिग बींसाठी एक मोठे वैयक्तिक नुकसान आहे. धर्मेंद्र कायम त्यांचा उल्लेख माझा छोटा भाऊ असा करायचे.

- Advertisement -

‘शोले’तील विरूच्या निधनानंतर जय म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट केली आहे. अमिताभ बच्चन यांनी रात्री अडीच वाजता भावनांना वाट मोकळी करून दिली. अमिताभ बच्चन यांनी जवळच्या मित्राला अखेरचा निरोप दिल्यानंतर एक्सवर पोस्ट केली आहे. बिग बींना धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
“आणखी एक धाडसी दिग्गज आपल्याला सोडून निघून गेला. तो स्टेज सोडून गेला आहे. तो एक शांतता मागे सोडून गेला आहे. एक शांतता जी सहन करणे खूप कठीण आहे. धरमजी म्हणजे महानतेचे एक प्रतीक, केवळ व्यक्ती म्हणून त्यांच्या महानतेसाठी नव्हे तर त्यांच्या मोठ्या हृदयासाठी (मनासाठी) आणि साधेपणासाठी देखील ओळखले जायचे,” असे म्हणत अमिताभ यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे, “पंजाबच्या ज्या गावातून ते आले होते त्या गावाच्या मातीचा सुगंध त्यांच्यासोबत आणला आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते त्या निसर्गाशी प्रामाणिक राहिले,”. “मनोरंजन हे एक असे क्षेत्र जे प्रत्येक दशकात बदलत गेले. चित्रपट उद्योग बदलला, पण ही व्यक्ती कधीही बदलली नाही. त्याचे हास्य, त्याच्याबद्दल वाटणारं आकर्षण आणि त्याच्या भेटीतील ऊर्जा त्याच्या सभोवतालच्या प्रत्येकापर्यंत पोहोचली. हे असं उदाहरण या व्यवसायात दुर्मिळ आहे. आमच्यात जे काही होतं ते सारं रिकामं झालं आहे. त्यांच्या जाण्याने आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली असून ती नेहमीच राहील,” असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

दरम्यान, धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या नातवाबरोबरचा आहे. धर्मेंद्र यांनी अगस्त्य नंदाबरोबर ‘इक्कीस’मध्ये काम केलं आहे. या चित्रपटातील धर्मेंद्र यांचं लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आणि काही तासांनी त्यांच्या निधनाची बातमी आली. ‘इक्कीस’ हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अध्यासन –...

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स' या संस्थेत अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी...