Saturday, September 26, 2026
Homeक्राईमCrime Story: एका रात्रीचा थरार अन् कुऱ्हाडीचा वार; जेव्हा बहिणीच्या रक्षणासाठी 'ती'...

Crime Story: एका रात्रीचा थरार अन् कुऱ्हाडीचा वार; जेव्हा बहिणीच्या रक्षणासाठी ‘ती’ बनली ढाल

नाशिक | भारत पगारे
त्या रात्री आड गाच शिवारात कमालीचा गारठा होता. शिंदे यांच्या शतात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांजवळ अंधार पसरला होता. बाहेरच्या पडवीत मजुरांचा मुकादम महेशभाई गाढ झोपेत होता. अचानक… अंधारातून एक आकृती बाहेर आली. तिच्या हातात कुऱ्हाड होती. गाढ झोपेत असलेल्या महेशभाईच्या जवळ जाऊन त्या आकृतीने कुऱ्हाड हवेत उगारली अन् थेट त्याच्या डोक्यात घाव घातला! एका क्षणात रक्ताची धार उडाली… अन् महेशभाईचा जागीच गेम झाला!

सकाळी शेतात प्रेत सापडले, पण मारणारा कोण? आडगाव पोलिस ठाण्याचे (Adgaon Police Station) तत्कालीन गुन्हेशोध पथकप्रमुख व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे (dr. Sitaram Kolhe) घटनास्थळी पोहोचले. हत्येचे कारण अस्पष्ट होते आणि मारेकरी कोणताही पुरावा मागे सोडून गेला नव्हता. तपास सुरू झाला. मजुरांची चौकशी झाली, शेजारच्या टोळ्यांशी असलेले वाद तपासले गेले. पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते.

- Advertisement -

तपासादरम्यान डॉ. कोल्हे यांच्या नजरेने गर्दीतल्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले. ऊसतोड मजुरांमध्ये चार भावांसोबत त्यांची एक अत्यंत सुंदर बहीण आणि एक मानलेली तृतीयपंथीय बहीण आली होती. ती तृतीयपंथीय महिला त्या सुंदर मुलीच्या अवतीभोवती सतत फिरायची. एखाद्या बाऊन्सरप्रमाणेच ती त्या मुलीचे रक्षण करत होती. एका ऊसतोड मजुराच्या टोळीत ही तृतीयपंथीय महिला त्या मुलीला एका क्षणासाठीही एकटं का सोडत नाहीये? हा प्रश्न डॉ. कोल्हे यांच्या डोक्यात खटकला आणि तपासाची दिशाच बदलली. डॉ. कोल्हे यांनी त्या तृतीयपंथीयाला विश्वासात घेतले. भावनिक वातावरणात चौकशी सुरू झाली, अन् हळूहळू एका नराधमाचा काळा चेहरा समोर आला.

मजूर सुनीलने २०११ मध्ये बहिणीच्या लग्नासाठी महेशभाईकडून काही उसनवार पैसे घेतले होते. लग्न दुसऱ्या टोळीतील मुकादमाशी ठरले होते. पण सुंदर बहिणीला पाहून महेशभाईची नियत बिघडली होती. सन २०१२ च्या हंगामात जेव्हा सुनील बहिणीला न आणता एकटाच कामावर आला, तेव्हा महेशभाई त्याच्यावर भडकला. मुलीला गावाहून घेऊन ये, जायचे पैसे मी देतो, असे सांगून तो दबाव टाकू लागला. शेवटी सुनीलने बहिणीला आणले. पण कामावर आल्यापासून महेशभाई तिच्याशी जवळीक साधण्यासाठी संधी शोधू लागला. ही गोष्ट त्या तृतीयपंथीयाच्या लक्षात आली होती.

गॉल कसोटीत भारतीय संघाचा १६५ धावांनी दणदणीत विजय; भारताच्या फिरकीसमोर श्रीलंका गारद

महेशभाईची वाईट नजर
तृतीयपंथीयाने त्या मुलीला सावलीसारखे जपले. रात्री भावांसोबत पडवीत महेशभाई झोपायचा, तर आतल्या बाजूला तृतीयपंथीय त्या मुलीला कुशीत घेऊन झोपायची. महेशभाईला संधीच मिळत नव्हती. मुकादमाची ही वाईट नजर बहिणीचे लग्न ठरलेल्या दुसऱ्या टोळीच्या मुकादम भावरावला कळली. आपल्या होणाऱ्या पत्नीवर बाईट डोळा ठेवणाऱ्या महेशभाईचा काटा काढायचा, असा प्लॅन भावरावने आखला. त्या भल्या पहाटे, महेशभाई पडवीत एकटा झोपलेला असताना भावरावने अंधाराचा फायदा घेतला अन् कुन्हाडीच्या एकाच वाराने महेशमाईचा खेळ खलास केला.

अन् न्यायाचा विजय…
कथेचा उलगडा तर झाला होता, पण डॉ. कोल्हे यांना न्यायालयात भक्कम पुरावे द्यायचे होते. त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून भावराव त्या रात्री टोळीतून गायब असल्याचा पुरावा शोधला. कोर्टात खटला चालला. डॉ. कोल्हे यांनी मांडलेले भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीमुळे न्यायालयाने आरोपी भावरावला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका पोलिस अधिकाऱ्याची नजर अन् एका तृतीयपंथीयाने बहिणीसाठी घेतलेले आक्रमक रूप… यामुळे एका नराधमाचा शेवट झाला अन् एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.

ताज्या बातम्या