Sunday, June 14, 2026
Homeदेश विदेशमोठी राजकीय उलथापालथ! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार? बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार?

मोठी राजकीय उलथापालथ! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार? बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा आहे. जनता दल यूनायडेट पक्षाअंतर्गत मोठा उलटफेरविषयी चर्चा सुरू आहे. राज्यसभेसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु, यातच आता नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवायची तयारी सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. नितीश कुमार राज्यसभेवर गेले, तर बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे अंदाज बांधला जात आहे.

या चर्चेने देशाच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे. राज्यसभा निवडणुकीमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात फेरबदल होताना दिसत आहे. याबाबत जेडीयू आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्व पातळीवर सुरू झाली आहे. नितीश कुमार केंद्रात मोठी भूमिका स्वीकारू शकतात. तर भाजपला बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदावर दावा करू शकते. बिहारमधील संख्याबळानुसार भाजपकडून दावा ठोकणे स्वाभाविक मानले जात आहे.

- Advertisement -

आखाती देशात अडकेलेल्या नागरिकांसाठी सरकारकडून काय उपाययोजना? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली महत्वाची माहिती

भाजपने राज्यसभेसाठी ९ नावांची पहिली यादी घोषित केली आहे. या यादीत पक्षाध्यक्ष नितिन नबीन यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने त्यांना बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, बिहारमधील २, आसाममधील २, ओडिशातील २ आणि छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका उमेदवाराचे नावे आहेत.

जनता दल यूनायडेटचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा हे दिल्लीहून तातडीने पटना येथे आल्याने चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला राज्यसभेसाठी नितीश कुमार यांचा मुलगा निशांत यांचे नाव पुढे आले होते. परंतु अचानक नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. पटना येथे येण्याआधी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याशी चर्चा केली. संजय झा हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत.

जर नितीश कुमार यांनी दिल्लीच्या राजकारणात येऊन राज्यसभेचे सदस्य होण्याचा निर्णय घेतला तर बिहारमधील मुख्यमंत्र्यांची जागा रिक्त होईल. अशा परिस्थितीत, भारतीय जनता पक्ष, युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःचा मुख्यमंत्री निवडू शकतो. राज्यातील या संभाव्य सत्ता हस्तांतरणामुळे राजकीय समीकरणांना एक नवीन वळण मिळाले आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान या मोठ्या प्रशासकीय आणि राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत. सध्या, जेडीयू आणि भाजपचे सर्वोच्च नेतृत्व या उत्तराधिकार योजनेवर आणि भविष्यातील रणनीतीवर विचारमंथन करत आहे.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...