नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसल्याचे गुप्तचर यंत्रणांना आढळल्याने बिहार पोलिस मुख्यालयाने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांची ओळख पटली असून त्यांनी अतिरेक्यांचे स्केचही सार्वजनिक केले आहे. या दहशतवाद्यांची ओळख हसनैन अली (रावळपिंडी), आदिल हुसेन (उमरकोट) आणि मोहम्मद उस्मान (बहावलपूर) अशी झाली आहे.
जैशचे तीन दहशतवादी नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल राज्य पोलिस मुख्यालयाने सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्क केले. सीमावर्ती जिल्ह्यांच्या एसपींना सतर्क करण्यात आले. नेपाळ सीमेला लागून असलेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले जात आहेत.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूला पोहोचले होते. मागच्या आठवड्यात त्यांनी बिहारमध्ये प्रवेश केला. हे तिन्ही दहशतवादी बिहारमध्ये घुसल्याची माहिती आहे, पण ते बिहारमधील कुठल्या जिल्ह्यात किंवा कुठल्या ठिकाणी आहेत, याची माहिती नाही. त्यामुळे, तपास यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात काठमांडूतून त्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला आहे. सध्या ते बिहारमध्येच लपून बसले असून बिहार पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. ह्या दहशतवाद्यांचे टार्गेट काय आहे, ते कुठे लपले आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांची नावे आणि फोटो सार्वजनिक केली आहेत. त्यांच्या पासपोर्टशी संबंधित माहिती देखील शेअर करण्यात आली आहे. हे दहशतवादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूला पोहोचले आणि तिसऱ्या आठवड्यात नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये प्रवेश केला. ते मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचत असल्याचा संशय आहे. सीतामढी, मधुबनी, पश्चिम चंपारण, अररिया, किशनगंज आणि सुपौल या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दक्षता वाढवण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





