Friday, October 2, 2026
Homeक्राईमShrigonda : चारित्र्याच्या संशयातून अल्पवयीन मैत्रिणीचा निर्घृण खून

Shrigonda : चारित्र्याच्या संशयातून अल्पवयीन मैत्रिणीचा निर्घृण खून

मृतदेह जंगलात नेवून जाळण्याचा प्रकार || संशयित पिता-पूत्र अटकेत

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर सोबत राहत असलेल्या अल्पवयीन मैत्रिणीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळण्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तरूणासह त्याच्या वडिलांना अटक केली असून, घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सुखदेव ओव्हाळ (रा. काळकाई चौक, श्रीगोंदा) व त्याची अल्पवयीन मैत्रीण (वय 17, रा. श्रीगोंदा) गेल्या तीन महिन्यांपासून एकत्र शुभमच्या घरी राहत होते. त्यांच्यात सोमवारी (15 जून) दुपारी चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता. या वादातून संतापलेल्या शुभमने मुलीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर फरशीचा तुकडा डोक्यात घालून गंभीर जखमी केल्याने तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर शुभमने मृतदेह घरातच लपवून ठेवला. घटनेनंतर शुभम हा केडगाव (अहिल्यानगर) येथे राहणार्‍या आपल्या आई-वडिलांकडे गेला. तेथे त्याने मैत्रिणीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी (16 जून) सकाळी शुभम व त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ हे श्रीगोंद्यातील घरात आले. त्यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला आणि पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मृतदेह दुचाकीवरून वडाळी रोडलगतच्या जंगल परिसरात नेला. तेथे लाकडे गोळा करून मृतदेहावर पेट्रोल टाकत जाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वडाळी रोडवरील जंगल परिसरात एक मृतदेह जळत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर शुभम ओव्हाळ व त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक सचिन लिमकर व प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार सचिन लोळगे, संदीप राऊत, संदीप शिरसाठ, राहुल मोढळे, नय्युम पठाण, आनंद मैड, विवेक दळवी, साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....