Wednesday, June 17, 2026
HomeनाशिकNashik Crime News : विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Nashik Crime News : विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उपनगर पोलीस ठाणे (Upnagar Police Station) येथे तक्रार मागे घेण्याच्या वादातून एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २२ एप्रिल) रात्री उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, धोबीवाडा, देवळाली गाव येथील आदेश निवृत्ती बुवा याच्याविरुद्ध तसेच त्याच्या नातेवाईकांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा खोटा व एकतर्फी असल्याचा आरोप करत बुवा यांनी संताप व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासमोरच त्यांनी विषारी औषध सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी (Police) तात्काळ हालचाल करत जखमी आदेश बुवा याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच बुवांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करत आक्रोश व्यक्त केला. आदेश बुवा यांचे वडील निवृत्ती बुवा यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...