Friday, April 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

बारागाव पिंप्री रस्त्यावर शहरातील कानडी मळ्याजवळ सिमेंट कॉक्रिटच्या रेडिमिक्सर वाहनाच्या धडकेत दुचाकीवरुन चाललेला शेतकरी पाठीमागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी (दि.१४) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. संदीप विठ्ठल उकाडे (३८) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

येथील उकाडे मळ्यात राहणारे सदीप यांची शेती व दुग्धव्यवसाय असून सायंकाळी ते कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळी ७ वा. ते दुचाकीवरुन घरी जात असताना कानडी मळ्याजवळील पेट्रोलपंपाजवळ पाठीमागून आलेल्या रेडिमिक्सरने धडक दिली. यामुळे संदीप रेडिमिक्सरच्या पाठीमागील चाकाखाली सापडले. रेडिमिक्सरचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर रेडिमिक्सरच चालकाने वाहनासह तेथून बा. पिंप्रीच्या दिशेने पळ काढला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ संदिप यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करुन फरार रेडिमिक्सरला तालुक्यातील हिरवगाव परिसरातून ताब्यात घेतले.

संदिप त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, बा. पिंप्री रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी रुंदीकरण झाल्याने वाहनचालक सुसाट वेगाने या रस्त्याने वाहने चालवत असतात. त्यामुळे ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

व्हिडिओ

Paratwada Video Scandal: मोबाईलमधील व्हिडिओंचा डेटा, विकृत स्पर्धा; अयानचा व्हिडिओ कांड...

0
अमरावती | Amaravatiअमरावती जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा व्हिडिओ प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सोशल मीडियावरुन मुलींना...