Saturday, August 1, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गोकुळ गिते रवाना; राजकीय...

Nashik Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गोकुळ गिते रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईकडे (Mumbai) रवाना झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईकडे रवाना होताना गिते काहीसे नाराज आणि तणावाखाली दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी त्यांच्या पत्नीही सोबत असल्याने या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गितेंचे बंड थंड होणार? दराडे बंधूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, काय ठरलं?

आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गिते परिवाराने स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांशी (Voter) संपर्क वाढवत स्वतंत्र राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे गोकुळ गिते निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार की पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार वेगळी भूमिका घेणार, याबाबत राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : “दराडे निष्क्रिय, आठ दिवसांपासून प्रलोभने, भावाचा आणि मंत्र्यांचा…”; गोकुळ गिते मनातील सगळंच बोलले, नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, नाशिक विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी, पक्षीय नाराजी, अपक्षांची भूमिका आणि पडद्यामागील राजकीय घडामोडींमुळे वातावरण अधिकच तापले आहे. मुख्यमंत्री भेटीनंतर गोकुळ गिते यांची पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे (Nashik District) लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : ‘ज्यूदो’त भारताची सुवर्ण झेप; अस्मिता डे आणि...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या ज्यूदोपटूंनी इतिहास रचत देशाच्या पदकसंख्येत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता...