Sunday, October 18, 2026
Homeदेश विदेशPM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट...

PM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर जगभरातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत पंतप्रधान मोदींनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर एक अत्यंत भावूक आणि मार्गदर्शक पोस्ट शेअर केली आहे.

“जनसेवा हीच सुशासनाची सर्वात मोठी कसोटी आहे”
आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी एक ‘संस्कृत सुभाषित’ देखील शेअर केले आहे, ‘सदानुरक्तप्रकृतिः प्रजापालनतत्परः। विनीतात्मा हि नृपतिर्भूयसी श्रियमश्नुते।’
“जो लोकप्रतिनिधी सेवा हाच आपला धर्म मानून निरंतर जनहितासाठी कार्य करतो, सुशासनाच्या माध्यमातून जनतेची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करतो; तसेच विनम्रता आणि संयम राखून विकासाच्या ध्येयाने समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित राहतो, तोच खऱ्या अर्थाने जनविश्वास, यश आणि समृद्धी प्राप्त करतो. विनम्रता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेने निरंतर कार्य करणारी व्यक्तीच जनतेचा विश्वास संपादन करू शकते.”

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१४ पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत सुत्रे हाती घेतली होती. त्यानंतर २०१९ साली दुसऱ्यांदा तर २०२४ साली सलग तिसऱ्यांदा ते या पदावर आरूढ झाले. तब्बल ४,३९९ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान नेहरू ४,३९८ दिवस पंतप्रधानपदावर होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील १४ वर्षांपेक्षा जास्त काळ देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते, मात्र त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता.

पुरुषोत्तम पुरी येथे मोठी दुर्घटना टळली! ३५ भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली, नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : पाऊस पुन्हा परतला! राज्यातील दहा जिल्ह्यांना IMD...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हिटचा (October Hit) चटका चांगलाच जाणवत आहे. यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर जिल्ह्यांत उकाडा...