Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुरुषोत्तम पुरी येथे मोठी दुर्घटना टळली! ३५ भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली,...

पुरुषोत्तम पुरी येथे मोठी दुर्घटना टळली! ३५ भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली, नेमकं काय घडलं?

बीड | Beed
बीडच्या माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीच्या पात्रात पलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिंदफणा नदीच्या पात्रातून दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारी ही बोट नदीपात्राच्या मध्यभागी उलटली आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुरुषोत्तमपुरी येथील एका मंदिरात दर्शनासाठी भाविक बोटीने नदी पार करत होते. गोदावरी पात्राच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोट अचानक असंतुलित होऊन बुडाली. बोटीत ३५ पेक्षा जास्त भाविक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोट चालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

- Advertisement -

Maharashtra Schools: राज्यातील शाळा १५ की २२ जूनला सुरु होणार? शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय

पुरुषोत्तमपुरी येथे दोन मंदिरे असून त्यापैकी एका मंदिरात जाण्यासाठी भाविकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. भाविकांच्या म्हणण्यानुसार, काही बोट चालकांकडून वारंवार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अतिभाराने प्रवास केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पोर्नो शेअरिंग महागात; नाशिकमधील आंबटशौकीन सोशल मिडिया...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सोशल मीडिया (Social Media) आणि इंटरनेटच्या (Internet) माध्यमातून लहान मुलांचे अश्लिल फोटो, व्हिडिओ (चाईल्ड पोर्नाेग्राफी) अपलोड आणि शेअर करणाऱ्यांविरुद्ध केंद्र...