Thursday, August 20, 2026
Homeक्राईमCrime News : अवैध बिंगो, जुगारावर डीवायएसपी पथकाचे छापे

Crime News : अवैध बिंगो, जुगारावर डीवायएसपी पथकाचे छापे

तोफखाना हद्दीत दोन ठिकाणी कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात नव्याने रूजू झालेले पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अवैध बिंगो व जुगार धंद्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (23 सप्टेंबर) तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून बिंगो व कल्याण मटका जुगार खेळविणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

झुलेलाल मंदिराच्या मागील बाजूस महाराजा चिकन दुकानाशेजारील शेडमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी एलसीडी स्क्रीनवर आकडे दाखवत लोकांकडून पैसे लावून ऋषिकेश राजु चव्हाण (रा. रासनेनगर चौक, सावेडी) हा बिंगो जुगार खेळवित असल्याचे पोलिसांनी रंगेहात पकडले. तर खेळणार्‍या इसमाचे नाव रवींद्र बलबीरसिंग सैंगर (रा. वृंदावन कॉलनी, बोल्हेगाव) असे समोर आले. त्यांच्याकडून 30 हजार 610 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच याच परिसरातील दुसर्‍या ठिकाणी छापा टाकण्यात आला.

येथे किशोर रावसाहेब उमाप (रा. शांतीपुर, तारकपूर, अहिल्यानगर) हा इसम लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार खेळविताना पकडला. त्याच्या ताब्यातून 1 हजार 610 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाया प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपअधीक्षक डॉ. टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, अंमलदार हेमंत खंडागळे, सागर व्दारके, महेश मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील युद्धाच्या धोरणामुळेच डांबराची टंचाई

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या...