Wednesday, October 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSIR वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्री फडणवीसांचे ९ मुद्द्यांत उत्तर, म्हणाले—‘अचूक मतदार...

SIR वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्री फडणवीसांचे ९ मुद्द्यांत उत्तर, म्हणाले—‘अचूक मतदार यादी…

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी SIR प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत ती रद्द करण्याची मागणी केली आहे. ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या ‘गर्जना मोर्चा’नंतर हा मुद्दा आणखी तापला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत SIR प्रक्रियेबाबत विरोधकांच्या आरोपांना मुद्देसूद उत्तर दिले आहे.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी, यासाठी SIR ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रात SIR 2026 अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

SIR वर विरोधकांचा नेमका आक्षेप काय?
SIR प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मतदार यादीतील कथित अनियमितता आणि पारदर्शकतेच्या अभावाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राज ठाकरे यांनी मतदारसंख्येतील वाढीवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. SIR प्रक्रियेमुळे मतदारांचा मतदानाचा अधिकार धोक्यात येऊ शकतो, असा विरोधकांचा दावा आहे.

अचूक आणि अद्ययावत मतदार यादी, विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा आधार!

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादीतील नोंदी अचूक व विश्वासार्ह राहाव्यात, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील SIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर SIR 2026 मधील महत्त्वाची माहिती…

महाराष्ट्र SIR 2026 – आकडेवारी:

✅ SIRपूर्वी महाराष्ट्रातील 9.78 कोटींहून अधिक मतदार प्रारूप मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी आधारभूत यादीत होते.

✅ 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.

✅ जुन्या मतदार यादीतील ज्या मतदारांची संबंधित गणना प्रपत्रे प्राप्त झालेली नाहीत, त्यांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंद झालेली (दुबार नोंदणी) किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.

✅ अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. EPIC क्रमांकाच्या आधारे नागरिकांना आपले नाव तपासता येणार असून मतदान केंद्रनिहाय ASDD यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

✅ प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना प्रपत्र-6 आणि घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.

✅ 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रपत्र-6 द्वारे अर्ज करता येणार आहे.

✅ ऑनलाइन अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal वर करता येतो. संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे.

✅ प्रारूप मतदार यादी आणि SIR अंतर्गत ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना EPIC क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे आपले नाव तपासता येणार आहे.

योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

#Maharashtra #SIR #ElectionCommission— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 6, 2026

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर SIR प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे आणि मु्द्दे मांडत SIR 2026 मधील महत्त्वाची माहिती पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला लिहिले आहे की, “अचूक आणि अद्ययावत मतदार यादी, विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा आधार! प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादीतील नोंदी अचूक व विश्वासार्ह राहाव्यात, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील SIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर SIR 2026 मधील महत्त्वाची माहिती…”

तसेच, त्यांनी महाराष्ट्र SIR 2026 संपूर्ण आकडेवारी या पोस्टच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे.

  • SIRपूर्वी महाराष्ट्रात ९.७८ कोटींहून अधिक मतदार आधारभूत यादीत होते.
  • ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ७.७१ कोटींहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
  • संबंधित गणना प्रपत्रे प्राप्त न झालेल्या मतदारांमध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणी असलेल्या मतदारांचा समावेश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
  • अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना प्रपत्र-६ आणि घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.
  • १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रपत्र-६ द्वारे अर्ज करता येणार आहे.
  • ऑनलाइन अर्ज Voter Services Portal वर, तर ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे करता येणार आहे.
  • प्रारूप मतदार यादी आणि ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी EPIC क्रमांक प्रारुप यादीतील आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करणे महत्वाचे आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये केले आहे.

ताज्या बातम्या

नोबेल

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; हेन्री बी. कागन, केन्सो सोई यांना संयुक्तपणे...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiजगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize 2026) घोषणा सुरू झाली आहे. यातील रसायनशास्त्र (Chemistry) विषयातील नोबेल...