Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik News: गंगापूरसह धरणांचा विसर्ग वाढला; नांदूरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक ८२ हजार क्युसेक

Nashik News: गंगापूरसह धरणांचा विसर्ग वाढला; नांदूरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक ८२ हजार क्युसेक

नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शुक्रवारी (दि. २४) सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 13,932 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकर्‍यांनी आणि व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

गंगापूर धरणासह जिल्ह्यातील अन्य धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून सर्वाधिक ८२ हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह पुढे सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहातील गावांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

Nashik Rain News: जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा जोर कायम; आज ऑरेंज अलर्ट

शुक्रवारी सकाळपासून धरण विसर्ग (क्युसेकमध्ये)
गंगापूर – १३,९३२
गौतमी गोदावरी – ३,०००
पालखेड – १८६०
पुणेगाव – ३२२१
दारणा – १९,३१२
भावली – २८६५
वालदेवी – ३१८१
कडवा – १२,८३०
नांदूर मध्यमेश्वर बंधारा – ८२,०००
भाम – ७३८३
भोजापूर -१५२४
चणकापूर – १८,८७९
हरणबारी – ४९००
केळझर – १६८२

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...