नाशिक | Nashik
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. अशातच काही वेळापूर्वी जिल्ह्यातील भाजपचा पहिला निकाल हाती आला होता. त्यात नाशिक पश्चिमतून सीमा हिरे विजयी झाल्या होत्या. यानंतर आता भाजपचा दुसरा निकाल हाती आला असून बागलाणमधून दिलीप बोरसे विजयी झाले आहेत.
- Advertisement -
दिलीप बोरसे विसाव्या फेरी अखेर १ लाख २९ हजार ६३८ मतांनी विजयी झाले आहेत. तर नाशिक मध्य मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे १७ हजार ८३५ मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक पूर्वतून राहुल ढिकले ६८ हजार ३८७ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच चांदवड-देवळा मतदारसंघातून भाजपचे डॉ.राहुल आहेर ४४ हजार ६२५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपचे हे उमेदवार देखील विजयाकडे वाटचाल करत आहेत.