Monday, December 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMurlidhar Mohol : "माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी…",मुरलीधर मोहोळांचं ट्विट चर्चेत

Murlidhar Mohol : “माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी…”,मुरलीधर मोहोळांचं ट्विट चर्चेत

मुंबई । Mumbai

राज्यातील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं तरीही महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी अद्याप रखडला आहे. निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरुन शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं आता उघडकीस आलं आहे.

- Advertisement -

अशातच सोशल मीडियावर भाजप (BJP) धक्कातंत्राचा अवलंब करणार असून नुकतेच पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. भाजप पक्षश्रेष्ठी मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातली धक्कातंत्राचा वापर करुन मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री बनवतील अशी चर्चा सुरु आहे. मात्र पुण्याचे खासदाराने मुरलीधर मोहोळ यांनी या चर्चा निराराधार आणि खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुरलीधर मोहोळ ट्विट करत म्हणाले की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे. असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजप अनपेक्षित निर्णयांसह धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. महाराष्ट्रातही तोच पॅटर्न अवलंबला गेल्यास मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण नेत्याचा विचार होऊ शकतो. पुण्याचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातील आहे. तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. यंदा पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मोहोल यांच्या नावाची मुख्यमंत्रि‍पदासाठी चर्चा रंगत होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या