Monday, August 17, 2026
HomeनगरLoni : रविवारपासून प्रवरा नदीत पाणी

Loni : रविवारपासून प्रवरा नदीत पाणी

ना. विखेंच्या आदेशामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा

लोणी |वार्ताहर| Loni

उन्हाची वाढती तीव्रता आणि नदीकाठच्या गावांमधील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन, दिनांक 10 मे 2026 पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. मागील काही दिवसांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावांमधील पाण्याचे उद्भव आटल्याने गावपातळीवरील पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत कमी पडू लागले आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पिकांचा प्रश्न गंभीर झाला असून, टंचाईग्रस्त गावांमधून टँकरची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक गावांतील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

यावर मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेऊन धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दि. 10 मे 2026 पासून प्रवरा नदीपात्रात आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होणार आहे. उपलब्ध पाणी अतिशय काटकसरीने वापरावे, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शेवटच्या गावाला पाणी मिळेपर्यंत जलसंपदा विभागाने सतर्क राहावे, अशा कडक सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...