Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो…"; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरेंना...

“आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो…”; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरेंना डिवचलं

मुंबई | Mumbai
मराठी भाषेवरुन राज्यात अनेक दिवसांपासून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. भाषा न बोलण्याच्या वादावरुन मीरा भाईंदर येथे एका परप्रांतीय व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, या मारहाणीनंतर राज्यभरात मनसे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद पेटलेला आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर परराज्यातील अनेक हिंदी भाषिक नेते, अभिनेते आक्रमक झालेले आहे. आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचे आहे ते करा अशी विधाने करताय. या प्रकरणात आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी भर टाकली आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावर बोलत अप्रत्यक्षपणे मराठीसाठी लढणाऱ्यांना ‘कुत्रा’ म्हणून संबोधले आहे, यावरुन आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिकांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आपल्या घरात कुत्राही वाघ असतो म्हणत डिवचले आहे.

- Advertisement -

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ट्विट केले असून “आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, असा खोचक टोला लगावत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची दुबेंनी दाऊद इब्राहिम सोबत तुलना करत एक सवाल केला.

YouTube video player

काय ट्विट केले आहे?
खासदार दुबे यांनी मराठीतून एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.” या मुद्द्यावरुन वाघ आणि कुत्रा अशी तुलना केल्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारचे ट्विट करुन खासदार निशिकांत दुबेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे आणि शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे यावर आता मनसे आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दाऊद इब्राहिमशी तुलना
खासदार निशिकांत दुबेंनी म्हटले आहे की, “मुंबईमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यात आणि काश्मीरमधून कश्मिरी हिंदूंना हाकलून लावणाऱ्या सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर किंवा मुंबईतील हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्या काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केले, दुसरा हिंदीमुळे अत्याचार करत आहेत”, अशी टीका दुबे यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...