Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये कसं उतरलं? मंत्री भुजबळांनी स्पष्टच सांगितलं;...

Chhagan Bhujbal : हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये कसं उतरलं? मंत्री भुजबळांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ” हा अपघात…

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मुंबईवरून पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी निघाले असता त्यांचे हेलिकॉप्टर पायलटने हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी वाहनांच्या पार्किंग क्षेत्रात उतरविले. त्यामुळे मोठा अपघात होता होता वाचला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसून, सर्वजण सुखरूप आहेत. दरम्यान आता या घटनेवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड करताना पायलटची गंभीर चूक; मोठा अनर्थ…

यावेळी ते म्हणाले की, “हा अपघात (Accident) वगैरे काही नव्हता, आम्ही सर्वजण सुरक्षित बाहेर आलो. काळजी करण्याचे कारण नाही, फक्त हेलिपॅड न दिसल्यामुळे पायलटने कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवले. घटनेच्या वेळी शाळेचा परिसर, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचानक हेलिकॉप्टर खाली उतरताना पाहून काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही” असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : Tushar Bhosale : “मौलाना शरद पवार जाळीदार टोप्या घालून इफ्तार…”; ‘त्या’ विधानावरून भाजपच्या तुषार भोसलेंची जोरदार टीका

तसेच फक्त तांत्रिक कारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, याला अपघात म्हणणे चुकीचे ठरेल, असे देखील मंत्री भुजबळ म्हणाले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी सांगितले की, “आपण सर्व सुरक्षित बाहेर आलो आहोत, त्यामुळे विनाकारण अफवा पसरवू नयेत. सर्वांनी शांत राहावे, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची उलाढाल सापडलीच ! ईडीकडून अशोकसह कल्पनाची चार बँक खाती गोठवली

अशोक खरात प्रकरणावरही केलं भाष्य

यावेळी भुजबळ यांनी म्हटले की, “अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांपासून दूर राहावे, समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा.जे खरात याच्या दुषकृत्यांमध्ये सामील आहेत त्यांच्यावरती गेल्या सहा महिन्यापासून मुख्यमंत्र्यांचा वॉच आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. या लोकांमुळे नाशिक जिल्हा बदनाम होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

Nashik Fraud Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली दाम्पत्याला साडेचार लाखांचा गंडा;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणाऱ्या एका हायप्रोफाईल 'बंटी-बबली'चा कारनामा नाशिकमध्ये (Nashik)...