Thursday, July 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचं पोलीस...

सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचं पोलीस खातं…

पुणे | Pune
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीला मिळालेल्या तक्रारीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडूनच असल्याचा आरोप केला गेला आहे. बीडमधील व्यक्तीने ही तक्रार केली असून, एसआयटीकडून या तक्रारीचा तपास सुरू करण्यात आला आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने एसआयटीकडे ही तक्रार केली आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची भूमिका वादात राहिली आहे. अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव येताच त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर त्यांच्याकडे असलेला राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच आता नव्या तक्रारीने राजकारणात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

ते आले,नमस्कार केला, नंतर थांबून चर्चा केली; PM मोदी-राहुल गांधींची चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान ही तक्रार खरी आहे की खोटी? याची खातरजमा होऊ शकलेली नाही. ही तक्रार राजकीय हेतून प्रेरित आहे का? किंवा कुणीतरी खोडसाळपणा केला, याचा तपासही आता एसआयटीकडून केला जाणार आहे. मात्र या तक्रारीची मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांनी दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले?
या तक्रारीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पूर्ण काळजी घेऊ. महाराष्ट्राचं पोलीस खाते काळजी घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जरूर अशा प्रकारचे पत्र असेल, जे काही येत असेल त्याची चौकशी केली जाईल.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....