Sunday, September 27, 2026
Homeमुख्य बातम्याविधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजपाने या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

भाजपाने माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता सातव यांनादेखील विधानपरिषदेचे तिकीट देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ‘महाराष्ट्र शासन’ची पाटी लावून कळवणच्या व्यापाऱ्याचा कांद्याने भरलेला...

0
लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon बाजारात कांद्याच्या (Onion) दराने उसळी घेतली असतानाच, आता कांदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. कळवण (Kalwan) येथील एका व्यापाऱ्याचा १२...