Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि पक्षवाढीची दिशा याबाबतची सविस्तर माहिती चव्हाण यांनी मोदी यांना दिली.

जानेवारी २०२५ ते जून २०२५ या कालावधीत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल चव्हाण यांनी यावेळी मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. या पक्षकार्य अहवालात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनकार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला, युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांना मोदींनी मार्गदर्शन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...