मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २० व्या हंगामापूर्वी सर्वच फ्रँचायझींनी आपल्या संघांची (Team) जोरदार बांधणी सुरू केली आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी गोव्यात आयपीएलचा मिनी लिलाव पार पडणार असून, त्यापूर्वी १७ नोव्हेंबरला सर्व १० संघांनी आपापल्या करारबद्ध (Retain) आणि करारमुक्त (Release) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या प्रक्रियेत अनेक धक्कादायक ट्रेड डील्स आणि बड्या खेळाडूंची (Players) सुट्टी पाहायला मिळाली आहे.
हार्दिक-अर्शदीपची अदलाबदल
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या १८ कोटी रुपयांच्या करारासह पंजाब किंग्जमध्ये दाखल झाला आहे. मुंबई आणि गुजरातनंतर पंजाब हा त्याचा तिसरा आयपीएल संघ असेल. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग पंजाबची साथ सोडून १८ कोटी रुपयांत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.
पंत दिल्लीत, तर कुलदीप लखनौमध्ये
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत १५ कोटी रुपयांच्या रकमेसह पुन्हा आपल्या जुन्या दिल्ली कॅपिटल्स संघात परतला आहे, तर फिरकीपटू कुलदीप यादव दिल्ली सोडून लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे.
शमी राजस्थानमध्ये, सॅम करण लखनौला
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील व्यवहारानुसार वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मी (८ कोटी रुपये) आणि फिरकीपटू मणीमरन सिद्धार्थ (७५ लाख रुपये) राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाले आहेत. तर इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करण २.४ कोटी रुपयांच्या किमतीत लखनौच्या संघात गेला आहे.
हर्षल पटेल गुजरात टायटन्समध्ये
दरम्यान दोन वेळा पर्पल कॅप जिंकणारा अनुभवी वेगवान गोलंदाज हर्षल पटेल ४ कोटी रुपयांच्या ‘ऑल-कॅश ट्रेड’द्वारे सनरायझर्स हैदराबादमधून गुजरात टायटन्समध्ये दाखल झाला आहे.
चेन्नई आणि हैदराबादमधील व्यवहार
वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि नॅथन एलिस चेन्नई सुपर किंग्ज सोडून सनरायझर्स हैदराबादकडून खेळतील. याबदल्यात लियाम लिव्हिंगस्टोन, जॅक एडवर्ड्स आणि झीशान अन्सारी चेन्नईच्या ताफ्यात सामील झाले आहेत.
ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्कची माघार; हैदराबादला मोठा धक्का
आयपीएल २०२७ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (१४ कोटी रुपये) खेळताना दिसणार नाही. आगामी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC), एकदिवसीय विश्वचषक आणि ॲशेस मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच कामाचा ताण (Workload) कमी करण्यासाठी त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
हैदराबादसाठी ४३ सामन्यांत १,३५१ धावा करणाऱ्या हेडने अभिषेक शर्मासोबत ४२ डावांत ६ शतकी भागीदाऱ्यांसह तब्बल १,८९२ धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. तसेच हेडसोबतच दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (११.७५ कोटी रुपये) यानेही आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे आगामी हंगामातून माघार घेतल्याने दिल्लीने त्याला रिलीज केले आहे.
सर्व १० संघांनी करारमुक्त (Release) केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
चेन्नई सुपर किंग्ज (CSK): महेंद्रसिंग धोनी (निवृत्त), मॅथ्यू शॉर्ट, प्रशांत वीर, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, अमन खान, कुलदीप यादव, मॅकनील नोरोन्हा, आकाश मधवाल, डायन फॉरेस्टर.
मुंबई इंडियन्स (MI): ट्रेंट बोल्ट, दीपक चहर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): जेकब बेथेल (२.६ कोटी), रिचर्ड ग्लीसन, मंगेश यादव, सात्विक देसवाल, विहान मल्होत्रा.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR): मथिशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, मुस्तफिझूर रहमान, उमरान मलिक, आकाश दीप, ब्लेसिंग मुझाराबानी, राहुल त्रिपाठी, नवदीप सैनी, दक्ष कामरा, लवनीथ सिसोदिया, तेजस्वी सिंग.
राजस्थान रॉयल्स (RR): शिमरॉन हेटमायर, तुषार देशपांडे, ॲडम मिलने, क्वेना मफाका, कुलदीप सेन, युधवीर सिंग, विघ्नेश पुथूर, रवी सिंग.
सनरायझर्स हैदराबाद (SRH): ट्रॅव्हिस हेड, कामिंदू मेंडिस, जयदेव उनाडकट, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएत्झी, शिवम मावी, डेव्हिड पायने, ओंकार तरमले, अमित कुमार, आरएस अंबरीश (तसेच हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जॅक एडवर्ड्स आणि झीशान अन्सारी यांना ट्रेड केले).
लखनौ सुपर जायंट्स (LSG): आवेश खान, ॲनरिक नॉर्टजे, वानिंदू हसरंगा, मॅथ्यू ब्रेट्झके, जॉर्ज लिंडे, नमन तिवारी, अर्शिन कुलकर्णी.
गुजरात टायटन्स (GT): इशांत शर्मा, ल्यूक वुड, कुलवंत खेजरोलिया, शाहरुख खान, कॉनर एस्टरहुइझेन.
पंजाब किंग्ज (PBKS): लॉकी फर्ग्युसन, मिच ओवेन, नेहल वढेरा, पायला अविनाश, प्रवीण दुबे, विशाल निषाद.
दिल्ली कॅपिटल्स (DC): दिल्लीने १६ खेळाडू कायम ठेवून ९ खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये मिचेल स्टार्क, नितीश राणा, पाथुम निसांका, अभिषेक पोरेल, दुश्मंथा चमीरा आणि करुण नायर यांचा समावेश आहे. (दिल्लीकडे आता ४ विदेशी खेळाडूंसह एकूण ९ जागा रिक्त आहेत.)




