Wednesday, November 18, 2026
Homeदेश विदेशभारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर? बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर? बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली | New Delhi
भारताची अर्थव्यवस्था सध्या गंभीर आव्हानांचा सामना करत असून, देशात बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेच्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. देशाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते, असा गंभीर इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना भारताच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले.

राहुल गांधी काय म्हणाले?
कोलंबिया विद्यापीठात आयोजित संवाद कार्यक्रमात पत्रकारांनी राहुल गांधी यांना भारतातील तरुणांच्या अपेक्षा आणि सध्याच्या परिस्थितीबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ‘भारत एका मोठ्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीत आहे. ही वस्तुस्थिती आहे. माध्यमे किंवा इतर घटक या समस्यांकडे दुर्लक्ष करू शकतात; मात्र देशात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. तसेच शिक्षण व्यवस्थेशी संबंधित गंभीर प्रश्न आहेत,’ असे राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

मला अल्लाहला…मशीदीतून बाहेर येताच कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड लतीफ भटचा खात्मा

भारताच्या आर्थिक विकासाचे सध्याचे मॉडेल जवळपास दशकभरापासून अपेक्षित परिणाम देत नसल्याचा दावाही त्यांनी केला. देशाच्या अर्थव्यवस्थेची रचना आणि रोजगारनिर्मितीच्या धोरणांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तरुणांना स्वतःचे भविष्यच दिसत नाही!
देशातील तरुणांमध्ये वाढत असलेली निराशा हा राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा ठरला. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांतील आणि औपचारिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना भविष्यातील संधींबाबत अनिश्चितता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांच्या मनात स्वतःच्या भविष्याबाबत विश्वास निर्माण होत नसल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतरही अपेक्षित रोजगार आणि करिअरच्या संधी उपलब्ध होत नसल्याने तरुणांमध्ये नाराजी असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले. यामुळे तरुण आणि त्यांच्या पालकांमध्येही विचारांची दरी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या पिढीने स्वीकारलेला करिअरचा मार्ग आजच्या तरुणांना यशाची हमी देऊ शकत नाही, अशी भावना नव्या पिढीत निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियावर प्रश्नचिन्ह
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवरही राहुल गांधी यांनी टीका केली. या योजनांमुळे देशातील उत्पादन क्षेत्राला आणि रोजगारनिर्मितीला अपेक्षित चालना मिळाली नसल्याचा त्यांचा दावा आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात केवळ सेवा क्षेत्राच्या माध्यमातून सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य नाही. उत्पादन क्षेत्राचा विस्तार आणि औद्योगिक विकासाशिवाय मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. भारताला मजबूत उत्पादन व्यवस्था उभारण्याची गरज असून, उद्योग आणि कारखानदारीला अधिक प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik Fraud News : टीडीआर व्यवहारात व्यावसायिकाला गंडा; ​२.६० कोटी उकळून...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायातील व्यावसायिकालाही विश्वासात घेऊन कशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला जाऊ शकतो, याचा प्रकार नाशिक शहरात समोर...