Tuesday, April 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: बोकड बळी, अघोरी पुजा, खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीतील नेत्याने…; रोहित पवारांचा...

Rohit Pawar: बोकड बळी, अघोरी पुजा, खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीतील नेत्याने…; रोहित पवारांचा स्फोटक दावा

पुणे | Pune
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज तीन महिने पूर्ण झाले. या प्रकरणातील तपासावरून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपूर्वी भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने अजित पवार यांच्या घराबाहेर आणि शेतात पूजा केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांचा घात की अपघात हा प्रश्न अद्यापही कायम आहे. या प्रकरणी CID तपास चालू आहे. रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आज रोहित पवार CID कार्यालयात महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. “आम्ही तिसऱ्यांदा आलो आहोत, पण एकही अधिकारी नाही. तपास गंभीरपणे घेतला जात नाही,” असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

एक बकरी मारून आणि पूजा करून टांगून ठेवण्यात आली
या संदर्भात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात खरातचा जो अँगल आहे तो सीआयडीने हाती घेतला नव्हता, तो हाती घ्यावा अशी मागणी करण्यासाठी मी येथे आलो आहे. अजितदादांच्या काटेवाडीत असलेल्या घराजवळील शेतात एक विहीर आहे. या विहिरीजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या झाडाला २८ तारखेपूर्वी एक बकरी मारून आणि पूजा करून टांगून ठेवण्यात आली होती. आता तिथे फक्त बकरीची हाडं आणि काही मांस शिल्लक आहे.

CM Devendra Fadnavis: आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचले का? “हा वाद निरर्थक; मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले

बारामतीतील छोटा नेता खरातच्या सातत्याने संपर्कात
रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार बारामतीमधील एक छोटा नेता आहे. तो खरातच्या सातत्याने संपर्कात होता. तसेच अजितदादांच्या पक्षातील जे नेते खरातच्या संपर्कात होते. त्या लोकांसोबत या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. काटेवाडी येथील घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यामध्ये या नेत्याचा सहभाग आहे, असे आम्हाला कळले आहे. तसेच अजितदादांच्या काटेवाडीमधील घराची आणि सहयोग येथे असलेल्या घराची पूजा ही या छोट्या नेत्याच्या माध्यमातून करण्यात आली, असे आम्हाला कळले आहे.

आम्ही यावर विश्वास ठेवत नाही, पण…
याचबरोबर, काटेवाडी परिसरात २७, २८ आणि २९ तारखांना काही पूजा झाल्याचा उल्लेख करत त्यांनी काळ्या जादूचा संशयही व्यक्त केला. या पूजांमध्ये बोकड बळी दिल्याचीही चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या मागचा हेतू काय होता? एकाच घराबाहेर सलग तीन दिवस पूजा का झाल्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पवार कुटुंबावर फार मोठा आघात होईल
तसेच एक शेतकरी अशोक खरात याला २६ की २७ जानेवारी रोजी भेटला होता. तसेच पवार कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी त्याने पवार कुटुंबातील सारं काही नीट होईल का, असे त्याने अशोक खरातला विचारले. तेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर फार मोठा आघात होईल, किंवा अडचण निर्माण होईल, असे अशोक खरातने त्या शेतकऱ्याला सांगितल्याचं आम्हाला कळलं आहे. आता या सर्वामध्येही सीआयडीन चौकशी करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.

व्ही के सिंगला बक्षीस म्हणून 9 कोटी 81 लाख रुपये दिले
रोहित पवार यांनी आज या अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान VSR कंपनीचे आहे, ज्याचे मालक व्ही के सिंग आहेत. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, ‘अजित दादांचा अपघात सकाळी झाला तेव्हा व्ही के सिंगला बक्षीस म्हणून 9 कोटी 81 लाख रुपये दिले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित दादांचा अंत्यविधी सुरू होता तेव्हा 16 कोटी 88 लाख रुपये दिले. आतापर्यंत 145 कोटी सिंग ला दिले आहेत.’

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२६ – ट्रम्प यांची ‘नरक’वारी अन् भारताची...

0
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर स्थायी मित्र किंवा स्थायी शत्रू नसतात, असतात ते फक्त स्थायी हितसंबंध, हे वचन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...