Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचले का? “हा वाद निरर्थक; मुख्यमंत्र्यांनी...

CM Devendra Fadnavis: आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचले का? “हा वाद निरर्थक; मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले

मुंबई | Mumbai
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकावरून बुलढाण्यात वातावरण चांगलेच तापले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरुन वाद पेटला असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. या पुस्तकातील काही मजकुरावर आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र आक्षेप घेत पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला. गायकवाड यांनी नंतर या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, हा वाद इथेच न थांबता आता रस्त्यावरच्या लढाईत रूपांतरित झाला आहे.

मंगळवारी (28 एप्रिल) कम्युनिस्ट पक्षाने आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर मोठे आंदोलन केले. यावेळी, प्रकाशक प्रशांत आंबीदेखील या आंदोलनात सहभागी होणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना एका अज्ञातस्थळी स्थानबद्ध केल्याचे समोर आले. त्यामुळे, आमदार गायकवाड यांच्या घराबाहेर सुरु असलेले आंदोलन चांगलेच पेटल्याचे दिसले. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

Pratap Sarnaik: १ मे पासून मराठी सक्तीची मोहीम आम्ही चालू ठेवणार, पण…; मंत्री सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा वाद निरर्थक आहे. देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणी अपमान करू शकत नाही. हे जे पुस्तक लिहिले गेले आहे, ते १९८८ मध्ये प्रकाशित झालेले आहे. उगाच वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भिडायचे. मला असे वाटते की, हे असामाजिक आणि असंवेदनशील कृत्य आहे. मला माहिती नाही की आक्षेप घेणाऱ्याने हे पुस्तक वाचले आहे की नाही? तसेच आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत, ‘आपण आंदोलन का करत आहोत?’ हे त्यांना माहिती आहे की नाही? याची कल्पना नाही. फक्त कोणतातरी मुद्दा पकडायचा आणि त्यावर वाद करायचा. यामुळे चर्चेत राहायचे, हा प्रयत्न योग्य नव्हे,” असे म्हणत त्यांनी दोन्ही बाजूंवर निशाणा साधला आहे.

बुलढाण्यात काय झाले?
बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर कम्युनिस्ट पक्षाने मोठा मोर्चा काढला. यावेळी, पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात जोरदार झटापट पाहायला मिळाली. मंगळवारी (28 एप्रिल) आमदार गायकवाडांच्या घरासमोर काढलेल्या मोर्चात शेकडो कम्युनिस्ट कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. पण, प्रशांत आंबी यांना बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत अज्ञातस्थळी स्थानबद्ध केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...