लहानपणापासून जेव्हा मितालीला जेव्हा नृत्य करताना पाहिले तेव्हा त्यात अधिक चांगले नृत्य यावे यासाठी मितालीला तिच्या आईकडून नृत्याची खरी प्रेरणा मिळाली, तर अभिनयाची प्रेरणा वडिलांकडून मिळाली. नृत्यकला आणि अभिनय या दोन्ही गोष्टी लहानपणापासून ती करत आली आहे. अभिनय, चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात मिताली सहभागी होत असते.
नृत्यासाठी तिने केस वाढवले, शिवाय कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता स्वत:च्या मेहनतीने नृत्यकला आणि त्यातील वेगवेगळे प्रकार ती शिकली. आईने तिच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. अजूनही घेत आहे. मितालीच्या नृत्यासाठी आणि ड्रेपरीसाठी अनेकदा पायपीट केली आहे, तर कधी खूप मोठी रक्कम सुध्दा खर्च केली आहे. नृत्यासाठी सर्व साज, मेकअप सर्व तीच करते.
पहिलीपासून तिच्यासाठी शाळेत स्वतंत्र नृत्य बसवले जात होते. हेच शाळेचं मितालीविषयी सहकार्य म्हणावे लागेल. कारण ती ग्रुपडान्समध्येही असायची आणि छोट्या नाटिकेतदेखील त्यामुळे लहानपणापासून शाळा, शिक्षक, ट्रस्टी यांचे खूप सहकार्य मिळाले. मितालीला अनेक नृत्य स्पर्धेत बक्षिसे मिळाली आहेत. पहिलीला असताना ओम गणेश मंडळाच्या बालनृत्य स्पर्धेत तिला पहिले बक्षीस मिळाले. त्यानंतर स्वामी सामाजिक ट्रस्टचे बक्षीस, नृत्यकला संस्था पुणेचे बक्षीस, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला अकादमीचा नृत्य बिजली पुरस्कार सातवीत असताना प्राप्त झाला. बीड येथील फुले शाहू आंबेडकर मित्रमंडळाचे 1111 रुपयांचे रोख पारितोषिक तिला मिळाले.
मिताली श्रीदेवी, उषा चव्हाण, लिओनार्डो दा विंची यांच्याव्यतिरिक्त तिच्या आईला आदर्श मानते. तिचे वडील प्रकाश साळवे हेही एक लेखक, पत्रकार, आहेत. मितालीची आई नीता प्रकाश साळवे या सई सिक्युअर या संस्थेच्या संचालिका आणि समृद्धी महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तिने दोन्ही क्षेत्रांत स्वत: स्वतंत्र ओळख निर्माण करावी, अशी तिच्या वडिलांची अपेक्षा आहे. नृत्यकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्यात मितालीने नाव कमवावे, असे तिच्या आईला वाटते. मोठेपणी शिक्षिका होण्याची तिची इच्छा आहे आणि त्यासाठी ती अपार मेहनत घेत आहे. तिच्या वयाच्या बालकांना ती सांगू इच्छिते की, सर्व गोष्टी शिकता येतात. जीवनाच्या वाटेवर कितीही खडतर प्रवास आला तरी आत्मविश्वास गमावू नका. कारण आत्मविश्वास माणसाला शेवटपर्यंत साथ देतो आणि यशस्वी करतोच. मितालीला तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
सागर खिस्ती




