Tuesday, May 5, 2026
Homeक्राईमCrime News : संगमनेरात 8 लाख 68 हजाराचे गोमांस जप्त

Crime News : संगमनेरात 8 लाख 68 हजाराचे गोमांस जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरामध्ये कत्तलखाने (Slaughterhouses) उध्वस्त केल्यानंतर पुन्हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) रविवारी (दि.5) भारतनगर परिसरात छापा (Raid) टाकून 8 लाख 68 हजार रुपये किमतीचे गोमांस व इतर मुद्देमाल जप्त (Beef Seized) केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्‍या ठिकाणांची व गोमांस विक्री करणार्‍या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डिले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन संगमनेर शहरामध्ये गोवंश कत्तलखान्यांवर कारवाईसाठी रवाना केले.

- Advertisement -

सदर पथक रविवारी शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत अजमत लतीफ कुरेशी (रा. भारतनगर) हा त्याचा साथीदार अस्लम बुढान कुरेशी (रा. संगमनेर) याच्या साहाय्याने राहत्या घराजवळ पत्र्याच्या आडोशाला गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ त्याठिकाणी जावून खात्री केली असता छोट्या टेम्पोमध्ये काहीजण गोमांस (Beef) भरत असताना दिसले. मात्र, पोलीस आल्याची चाहूल लागताच ते गल्ली बोळामध्ये पळून गेले. तर शेडच्या आडोशाला तिघेजण गोवंश जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले. त्यावेळी पथकाने निजम अय्याज कुरेशी (वय 21), निसार रहेमान कुरेशी (वय 30, दोघेही रा. गल्ली नं. 2 मदिनागनर), मोसीन अस्लम कुरेशी (वय 25, रा. गल्ली नं. 1 कादरीनगर) यांना ताब्यात घेवून पळून गेलेल्या साथीदारांचे नावे विचारले असता अजमत लतीफ कुरेशी, कासिफ अन्वर कुरेशी (रा.मदिनानगर) असे असल्याचे सांगितले.

त्यांच्याकडून 3 लाख 15 हजार रुपये किमतीचे 1050 किलो गोमांस, 5 लाख 50 हजार रुपये किमतीचा एक पिकअप, दोन हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी टोचे, चार चाकू, तीन काणस, एक हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रीक वजन काटा असा एकूण 8 लाख 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला. वरील सर्व आरोपींविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याची (Onion) 5966 गोण्यांची आवक...