Friday, May 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा लढण्याचा निर्णय योग्य, राजकारणातील परिपक्वता...

Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा लढण्याचा निर्णय योग्य, राजकारणातील परिपक्वता पार्थ पवारांमध्ये…; शरद पवार सगळंच बोलले

नवी दिल्ली | New Delhi

राज्यातील बारामती आणि राहुरी (Baramati and Rahuri) या विधानसभांच्या पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात बारामतीमधून महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी तर काँग्रेसकडून मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर राहुरीतून दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी भाजपकडून आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भरला बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज; म्हणाल्या, “मला स्वप्नातही…”

यावेळी ते म्हणाले की, “कोणतीही निवडणूक (Election) लढवायची असेल तर समोर कुणीतरी असेल हे मान्य करुनच लढवावी लागते. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्हाला दुःख आहे, त्यामुळे पवार कुटुंबप्रमुख म्हणून बारामतीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने (Congress) बारामतीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे.परिस्थिती पाहून काँग्रेसने निर्णय घेतला असेल”,असे शरद पवार यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Baramati By Election 2026 : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून ‘या’ बड्या नेत्याची माघार; DCM सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा?

तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aagahdi) म्हणून एकत्र असताना एखाद्या मतदारसंघात अशा काही अडचणी येतात, तो काही राष्ट्रीय विषय नाही, असे शरद पवारांनी म्हटले. तर राजकारणामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागले. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही असे म्हणत त्यांनी पार्थ पवारांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

हे देखील वाचा : Rahuri By Election 2026 : राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; प्राजक्त तनपुरेंची माघार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

विलिनीकरणाच्या विषयावरही बोलले

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये झाली होती. त्यावेळी अजित पवारांचा आग्रहा हा वेगळा होता. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर ही चर्चा थांबली. त्यामुळे आमच्या पक्षात आता विलिनीकरणाची चर्चा केली जात नाही. मात्र, भविष्यात विलिनीकरणासंदर्भात चर्चांबद्दल आता सांगू शकत नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात अधिकार, ताब्यात घेणे आणि आम्ही याचा कवडीमोल संबंध नाही. आम्ही त्याची चर्चा करत नाही. काय पत्र द्यायचं, कोणत्या सहकाऱ्यावर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी योग्य वाटेल ते करावं, अशी स्पष्ट भूमिका देखील त्यांनी मांडली आहे.

हे देखील वाचा : Rahuri By Election 2026 : राहुरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखे पाटलांची प्राजक्त तनपुरेंशी बंद दाराआड चर्चा, काय ठरलं?

राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत काय म्हणाले?

राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की, प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी राहुरीमध्ये माघार का घेतली याची माहिती नाही. माझ्या पक्षाने सांगितले की तनपुरे लढणार नसतील तर स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. त्यानंतर गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी देण्यात आली असं त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Anjali Damania : DCM शिंदेंच्या पीएचे खरातसोबत कॉल, समता पतसंस्थेतही अनेक व्यवहार; सीडीआर कुठून मिळाला? दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत कोपरगावच्या पदाधिकार्‍यांमध्ये वादंग दमबाजीमुळे महिला पदाधिकारी रूग्णालयात

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर कोपरगाव येथील दोन गटात शाब्दिक...