Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरक्षाबंधनाच्या दिवशी हृदयद्रावक घटना : बेपत्ता चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत

रक्षाबंधनाच्या दिवशी हृदयद्रावक घटना : बेपत्ता चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत

देवळा | प्रतिनिधी Deola

तालुयातील खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इयत्ता नववीत शिकणारी पल्लवी समाधान पगार (१४) हिचा मृतदेह शनिवारी (दि.९) दुपारी १ वाजता घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

खडकतळे येथील पल्लवी कोणालाही न सांगता गुरूवारी घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला, या संदर्भात ती बेपत्ता झाल्याची देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी दुपारी घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलीस तपासात आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी दिले. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...