Wednesday, September 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

चांदवड | वार्ताहर Chandwad

- Advertisement -

परसूल (ता. चांदवड) येथील परसूली-चिंचोली नदीच्या पुलाखाली आज रविवार (दि २२) रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलीस पाटील सोनाली सोनवणे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर चांदवड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक पाहणीत मृतदेहाचे तोंड बांधलेले असून शरीराला वेट-लिफ्टिंग रॉड बांधलेला असल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग दिला.

दरम्यान, उगाव (ता. निफाड) येथून १८ तारखेपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मृताचे नाव शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) असे असून तो आपल्या प्लॅटिना दुचाकीसह बेपत्ता होता.

या प्रकरणी चांदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...