Monday, August 17, 2026
Homeक्राईमलैंगिक अत्याचारप्रकरणी तरुण तेजपालला धक्का; उच्च न्यायालयाने ठरवलं दोषी

लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुण तेजपालला धक्का; उच्च न्यायालयाने ठरवलं दोषी

मुंबई | Mumbai
२०१३ मधील गोव्यातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Bombay High Court) ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांना मोठा न्यायालयीन धक्का दिल्ला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa Bench) गुरुवारी (६ ऑगस्ट) दिलेला निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत तेजपाल यांना दोषी ठरवले आहे. या निकालामुळे तब्बल १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या गाजलेल्या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यात आयोजित ‘थिंक’ परिषदेदरम्यान ‘तेहलका’ मासिकात कार्यरत असलेल्या एका महिला सहकाऱ्याने तरुण तेजपाल यांच्यावर हॉटेलच्या लिफ्टमध्ये दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी गोवा सत्र न्यायालयाने तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती, ज्याविरोधात गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामदार यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेतली.

- Advertisement -

Gen-Z ची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लॅन; ९ महत्वाचे निर्णय ठरणार गेम चेंजर?

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने गोवा सरकारचे अपील मान्य करत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण घटनाक्रमाचा नव्याने विचार करून तेजपाल यांना दोषी ठरवले. या निर्णयामुळे २०२१ मधील निर्दोष मुक्ततेचा आदेश रद्द झाला आहे. सुनावणीदरम्यान राज्य सरकारने सत्र न्यायालयाने पीडितेच्या वर्तणुकीबाबत चुकीचे निकष लावल्याचा युक्तिवाद केला होता, तर बचाव पक्षाने आरोप फेटाळून लावले होते.

देशभरात चर्चेचा विषय
तरुण तेजपाल प्रकरण हे भारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणांपैकी एक मानले जाते. २०२१ मधील निर्दोष मुक्ततेनंतर हा निकाल मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. आता उच्च न्यायालयाने तो निकाल उलटवत दोषी ठरवल्याने या प्रकरणाकडे पुन्हा संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे.

ताज्या बातम्या