Tuesday, July 7, 2026
HomeनाशिकNashik Rain News: सुरक्षिततेसाठी पर्यटकांच्या हुल्लडबाजीला 'ब्रेक'; नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील ट्रेकिंग पॉईंटस्,...

Nashik Rain News: सुरक्षिततेसाठी पर्यटकांच्या हुल्लडबाजीला ‘ब्रेक’; नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील ट्रेकिंग पॉईंटस्, धबधबे पुढील आदेशापर्यंत बंद !

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि हुल्लडबाजीचा विचार करता वनविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक वनवृत्तातील प्रसिद्ध गड-किल्ले, धबधबे आणि कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पावसाळी पर्यटन पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. पावसाचा वाढता जोर, दाट धुके आणि निसरडे झालेले रस्ते यामुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

गत आठवड्यापर्यंत त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील हरिहर गडावर पूर्वपरवानगीनुसार पर्यटकांना मर्यादित प्रवेश दिला जात होता. परंतु आता पावसाची भीतीदायक पाहता सर्वप्रकारची स्थिती पूर्वपरवानगी रद्द करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर आणि नाशिकचे सुमित निर्मळ यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. जर एखाद्या पर्यटकाने नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच स्थानिक सुरक्षारक्षक किंवा गाईड यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या हुल्लडबाजांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा वनविभागाने दिला आहे.

- Advertisement -

Kasara Ghat Landslide: नाशिक-मुंबई महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली, वाहतुक संथ गतीने

पर्यटकांची गर्दी होणाऱ्या सर्वच वन हद्दींमध्ये वनविभागाने बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. मुख्य रस्त्यांवर आणि गडांच्या पायथ्याशी सुरक्षेच्या दृष्टीने आणि मार्गदर्शनासाठी विशेष फलक लावण्यात आले आहेत. अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जात आहे.

या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर पूर्णपणे बंदी
नाशिक वनपरिक्षेत्र : अंजनेरी गड आणि परिसर पर्यटनासाठी पूर्ण बंद.
त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र : ब्रह्मगिरी, किल्ले हरिहर, दुगारवाडी धबधबा आणि पहिने येथील प्रसिद्ध नेकलेस फॉल.
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसूबाई
शिखर, सांदण दरी, भंडारदरा आणि कोकणकडा भागात ३१ जुलैपर्यंत प्रवेशबंदी.

पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असल्याने अभयारण्यात पर्यटनासाठी महिनाअखेरपर्यंत पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सध्या डोंगररांगांमध्ये प्रचंड धुके आणि मुसळधार पाऊस असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने बंदोबस्त वाढवला आहे. पुढील सूचनेपर्यंत पर्यटकांनी अभयारण्य व पर्यटन क्षेत्रात येणे टाळावे.
अनिल पवार, सहायक वनसंरक्षक, कळसूबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्य

ताज्या बातम्या

प्रमाणपत्र

बाईक-टॅक्सी चालकांना आता ‘हे’ प्रमाणपत्र असणार अनिवार्य; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील हजारो बाईक-टॅक्सी चालकांवर परिणाम करणारी मोठी घोषणा आज विधानसभेत झाली. राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी आता महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा...