Tuesday, September 29, 2026
HomeनाशिकNashik News: केबीएच विद्यालयाजवळ झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित; तक्रारीनंतर तातडीने कारवाई

Nashik News: केबीएच विद्यालयाजवळ झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित; तक्रारीनंतर तातडीने कारवाई

नाशिक | प्रतिनिधी
हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक ३० मधील केबीएच विद्यालयाजवळ झाड कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने संपूर्ण परिसर अंधारात गेला. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी सुमारे तीन तास लागतील, अशी माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर फरीद शेख यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी देवरे यांच्याशी संपर्क साधून झाडाचे छायाचित्र पाठविले. त्यानंतर उद्यान विभागाने तातडीने झाड कापणी पथक घटनास्थळी पाठवून झाड हटविण्याचे काम सुरू केले. झाड हटविल्यानंतर महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.

- Advertisement -

Nashik Rain News: नाशिकसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, ‘रेड अलर्ट’मुळे पर्यटनस्थळे बंद

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...