Friday, May 3, 2024
Homeजळगावखुशखबर : चाळीसगाव करोनामुक्त, १३ जणांची करोनावर मात

खुशखबर : चाळीसगाव करोनामुक्त, १३ जणांची करोनावर मात

शेवटचे दोन पॅाझिटिव्ह रूग्ण रुग्णालयातून घरी
प्रशासनाच्या कार्याला सलाम, १२ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

चाळीसगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

चाळीसगाव येथील कोविड केअर सेन्टरमधून शुक्रवारी डोणच्या दोन महिलांनी करोनावर मात केल्याने, त्यांना कोविड सेन्टरमधून मुक्त करण्यात आले होते.

आज दि.१३ रोजी पुन्हा शेवटच्या दोन करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली. शहरातील करोना बाधित २६ वर्षीय कंपाऊडर व १४ वर्षीय बालक करोनामुक्त झाल्याने, त्यांना कोविड केअर सेन्टर मधून घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ.डी.के.लाडे यांनी दिली आहे.

आतापर्यंत चाळीसगावात करोना बाधित १३ जणांना रुग्णालयात चांगल्या पध्दतीचे उपचार मिळाल्यामुळे, ते करोनावर मात करु शकले आहेत.

तसेच प्रशासनातर्फे करोना बाधिताची संख्या वाढून नये म्हणून शहरासह ग्रामीण भागात चोख उपाय-योजना केल्यामुळे कोरोना संख्या आटोक्यात आहे.

प्रशासनाच्या या कार्यालया चाळीसगावकरांचा ‘ सलाम ’ आहे. चाळीसगाव परिसरातील १३ जणांनी आतापर्यंत जरी कोरोना मात केली. तरी अजुन १६ जण कोरोना संशयित रुग्णायात उपाचार घेत असून १२ जणांच्या स्वॅबच्या तपासणीचे अहवाल आज येण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी चाळीसगाव करोनामुक्त झाले म्हणून हुरळुन जावू नये, प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन, गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. ‘ जोपर्यंत कोरोना आहे, तोपर्यंत आपल्या खबदारी घ्यायची आहे, हे लक्षात ठेवूनच घराच्या बाहेर पडायचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या