Friday, July 3, 2026
Homeजळगावचाळीसगाव : २४ तासात पुन्हा आढळला करोनाचा रुग्ण ; आनंदावर विरजन

चाळीसगाव : २४ तासात पुन्हा आढळला करोनाचा रुग्ण ; आनंदावर विरजन

नागदरोड परिसरातील महिला पॉझिटिव्ह , १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह, आतापर्यंत १३ जणांची कोरोनावार मात

चाळीसगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

येथील कोविड केअर सेन्टर मध्ये उपचार घेते असलेल्या शेवटच्या दोन करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कालच करोनावर यशस्वीपणे मात केली.

यात करोना बाधित २६ वर्षीय कंपाऊडर व १४ वर्षीय बालक करोनामुक्त झाल्याने, त्यांना कोविड केअर सेन्टर मधून घरी सोडण्यात आलेहोते. त्यामुळे चाळीसगाव हे करोनामुक्त झाले होते.

परंतू करोनामुक्तीची आनंदाला २४ तास होत नाही, तोच चाळीसगावात पुन्हा आज नागदरोड परिसरातील कनटेन्मेंट झोन मधील ४० वर्षीय महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला, तर उर्वरित १५ अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.

आतापर्यंत चाळीसगाव येथे शहरासह ग्रामीण भागातील १३ जणांनी करोनावर मात केली. १३ जाणांच्या करोनामुक्तीचा उत्साह चाळीसगावकरांसाठी फक्त २४ तासच टिकला. आज संकाळी पुन्हा करोना बाधित महिला आढल्यामुळे चाळीसगावकरांच पुर्नत: हिरमोड झाला असून त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन, गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. ‘जोपर्यंत कोरोना आहे, तो पर्यंत आपल्या खबदारी घ्यायची आहे’, हे लक्षात ठेवूनच घराच्या बाहेर पडायचे आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...