Friday, July 3, 2026
Homeजळगावधुळे : ट्रक-स्कार्पिओचा अपघात दोन ठार ; पुलावरून 50 फुल खाली कोसळले

धुळे : ट्रक-स्कार्पिओचा अपघात दोन ठार ; पुलावरून 50 फुल खाली कोसळले

फागणे गावाजवळील घटना

धुळे –
शरहापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या फागणे गावाच्या पुलावरून ट्रक आणि स्कापीओचा अपघात होऊन दोन्ही वाहने खाली कोसळली.

- Advertisement -

यात दोन जण ठार झाल्याचे सांगितले जाते आहे. सुरत – नागपूर महामार्गावर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.

अत्यंत जुना, कमकुवत आणि प्रचंड खड्डे असलेल्या हा पूल अपघाताचे केंद्र बनला आहे. जळगावहून धुळ्याकडे येणारी स्कापीओ आणि जळगावकडे जाणारा ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहने पुलावरून चक्क 50 फुत खाली कोसळले.

यात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. स्कापीओमधील 2 जण ठार झालेत, मात्र अद्याप या अपघाताची नोंद झालेली नाही. या घटनेमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला रहदारी खोळंबून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

सकाळी पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढला मात्र स्कापीओ पूर्णत: चक्काचूर झाली आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...