Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : डीनपदी धुळ्याचे डॉ.जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती

जळगाव : डीनपदी धुळ्याचे डॉ.जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती

ळगाव |
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या गैरकारभारास जबाबदार धरुन डीन डॉ.भास्कर खैरे यांच्यासह दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. आता प्रभारी डीनपदी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाचे डॉ.जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबत आदेश दिला आहे.

सोळा डॉक्टरांची नियुक्ती
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सोळा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

यात डॉ.अरूण हुमणे (चंद्रपूर), डॉ.मधुकर गायकवाड (मुंबई), डॉ.भारत चव्हाण (अहमदनगर), डॉ.व्यंकटेश जोशी (लातूर), डॉ.श्याम तोष्णीवाल (लातूर), डॉ.उदय जोशी (अंबाजोगाई), डॉ.देवानंद पवार (आंबेजोगाई), डॉ.अतुल गारजे (लातूर), डॉ.मृदूल पाटील (लातूर), डॉ.रणजीत एस. (लातूर), डॉ.किरण माळी (लातूर), डॉ.प्रविण बोदेवार (आंबेजोगाई), डॉ.मोहित खरे (नागपूर), डॉ.प्रवीण पवार (नागपूर), डॉ.महेश चावट (नागपूर), डॉ.शशांक मोडक (नागपूर) यांची जळगाव येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...