Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : खेडी येथील प्रौढाची आत्महत्या

जळगाव : खेडी येथील प्रौढाची आत्महत्या

जळगाव –
शहराजवळील खेडी येथील एका ५१ वर्षीय प्रौढाने दारुच्या नशेत एका शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

येथील मनोज गोपीचंद जाधव (वय ५१) यांनी दारुच्या नशेत खेडी शिवारातील एका शेतामधील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

- Advertisement -

याबाबत मयताचा मावस भाऊ पंडित उत्तम मराठे यांनी खबरी दिली. त्यावरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास एएसआय किरण पाठक करीत आहेत.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...