Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारचांगली बातमी : नंदुरबार : जिल्ह्यात आणखी चौघे करोनामुक्त

चांगली बातमी : नंदुरबार : जिल्ह्यात आणखी चौघे करोनामुक्त

नंदुरबार | प्रतिनिधी –

जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील तीन तर शहादा येथील एक असे चार रुग्ण आज कोरोनामुक्त झाले.

- Advertisement -

त्यामुळे जिल्ह्यातील एकुण नऊ रुग्ण कोरोनामुक्तझाले आहेत. आता जिल्ह्यात केवळ 10 कोरोनाबाधीत रुग्ण आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 21 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार शहरातील पाहिले चार रुग्ण दोन दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले होते.

त्यानंतर शहादा येथील महिला कोरोनामुक्त झाली होती. दरम्यान, आज अक्कलकुवा येथील 3 तर शहादा येथील एक रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 9 झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा रूग्णालयात १० जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये शहादा येथील पहिल्या कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ वर्षीय युवकाचा समावेश आहे. तर अक्कलकुवा येथील तिघांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या